12 April, 2026

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची पांगरा शिंदे गावाला भेट

 





हिंगोली, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे भूकंप मापन केंद्रांच्या नोंदीनुसार ४.७ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज रविवारी (दि.१२) पांगरा शिंदे येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली. काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती नागरिकांनी दिली असून प्रशासनाकडून आवश्यक ती पाहणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिक सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.

******

No comments: