21 April, 2026

 त्रैमासिक विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक



हिंगोली, दि. २१(जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी आस्थापनांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती असलेले माहे मार्च २०२६ अखेरचे ई आर-१ त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिल २०२६ पर्यंत डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट महास्वयंम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन भरणे बंधनकारक असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी कळविले आहे. 

सदर विवरणपत्र भरल्याची प्रत माहे एप्रिल २०२६ च्या वेतन देयकासोबत जोडणे आवश्यक असून, ही प्रत जोडल्याशिवाय वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना या कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच वितरित करण्यात आलेले आहेत. सर्व कार्यालयांनी आपले ईमेल आयडी, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, टॅन नंबर व पॅन नंबर नोंदवून आपली प्रोफाईल अद्ययावत करावी, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

 ******

No comments: