हिंगोली, दि. २२ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी भांडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्यसेवा, सुविधा व स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसरासह केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली.
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रात करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता, अँब्युलन्स शेड तसेच नळ दुरुस्तीच्या कामांची माहिती घेतली. उपस्थिती पटलाची पाहणी करून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही विचारणा केली. तसेच केंद्रात होणाऱ्या सरासरी प्रसूती, बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या आणि एन-क्वॉस गुणांकनाबाबत माहिती जाणून घेतली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. आलोक गट्टू यांनी यावेळी माहिती देताना, प्राथमिक आरोग्य केंद्रात सरासरी २ ते ३ प्रसूती होत असून दररोज ३० ते ५० रुग्ण बाह्यरुग्ण विभाग सेवेसाठी येत असल्याचे सांगितले. एन-क्वॉस स्वयंमूल्यांकनात केंद्राला ७६ टक्के गुण मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. स्वच्छतेसाठी केंद्रात एक परिचर उपलब्ध असून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भांडेगाव येथील एका महिलेची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्र परिसरातील वृक्षांचीही पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आलोक गट्टू, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश घुले तसेच जीएनएम आशा भवर उपस्थित होत्या.
*****




No comments:
Post a Comment