हिंगोली(जिमाका), दि. १७ : शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६ चे आयोजन रविवार दि. २१ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. २७ मार्च २०२६ ते दि. १६ एप्रिल २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, परीक्षार्थी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ साठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत आता दि. १७ एप्रिल २०२६ ते दि. २४ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन निर्धारित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
*******
No comments:
Post a Comment