28 October, 2026

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : आतापर्यंत ११ उमेदवारांची वगळणी !

        ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू आहे. विजयासाठी आवश्यक ८८,५५८ मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करण्यात येत आहे.

        दहाव्या वगळणीत ६८ मते असलेले गंगाधरे भालचंद्र लक्ष्मण, तर अकराव्या वगळणीत ७० मते असलेल्या मनिषा उर्फ मंदा खरात यांची वगळणी झाली आहे.

        आतापर्यंत एकूण ११ उमेदवारांची वगळणी झाली असून, ४१ पैकी ३० उमेदवार शिल्लक आहेत. वगळलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

        #औरंगाबादपदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #ElectionCounting #GraduatesElection #ChhatrapatiSambhajinagar

No comments: