०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू आहे. विजयासाठी आवश्यक ८८,५५८ मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करण्यात येत आहे.
बाराव्या वगळणीत ८४ मते असलेले प्रा. डॉ. अश्विनकुमार क्षीरसागर कोळीकर, तेराव्या वगळणीत ९२ मते असलेले कबाडी भागवत मदन, चौदाव्या वगळणीत ९४ मते असलेले ॲड. विठ्ठल कडवे, तर पंधराव्या वगळणीत ९६ मते असलेले डॉ. भाऊसाहेब केशवराव झिरपे यांची वगळणी झाली आहे.
आतापर्यंत ४१ पैकी १५ उमेदवारांची वगळणी झाली असून, २६ उमेदवार शिल्लक आहेत. वगळलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण सुरू आहे. अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
#औरंगाबादपदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #ElectionCounting #GraduatesElection #ChhatrapatiSambhajinagar
No comments:
Post a Comment