13 November, 2018

राष्ट्रीय पत्रकार दिनाचे 16 नोव्हेंबर रोजी आयोजन


राष्ट्रीय पत्रकार दिनाचे 16 नोव्हेंबर रोजी आयोजन

हिंगोली, दि. 13: प्रेस कॉन्‍सील ऑफ इंडियाने 16 नोव्‍हेंबर हा दिवस राष्‍ट्रीय पत्रकारिता दिन जाहिर केला आहे. या निमित्ताने  दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता येथील जिल्हा माहिती कार्यालयात जिल्ह्यातील पत्रकार संघ, विविध पत्रकार संघटना आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील सर्व पत्रकार, संपादक/संपादिका, छायाचित्रकार, मुक्त पत्रकार आदींनी या चर्चासत्रास उपस्थित राहावे , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.
00000

No comments: