03 November, 2018

बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी लवाद नामतालिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी लवाद नामतालिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.3: बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 चे कलम 84(4) अन्वये सन 2019-22 या कालावधीसाठी लवाद नामतालिका तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र व्यक्तीकडून दि. 1 ते 30 नोव्हेंबर, 2018 या कालावधीत अर्ज मागवून घेण्यात येत आहेत. सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवा निवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसींग ॲडव्होकेट्स, चार्टर्ड अकाउंटंट, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भुविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त  होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे.) सहकार विभागातील उपनिबंधक दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे) इत्यादीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. लवाद नियुक्ती करीता अर्हता व अनुभव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली यांचे कार्यालयात तसेच संबंधित सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयात पहावयास मिळतील. अर्ज मागणी व त्याची स्विकृती ऑफलाईन पध्दतीने विभागस्तरावर होणार आहे. तरी पात्र व इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा असे आवाहन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, हिंगोली यांनी केले आहे.

****




No comments: