01 November, 2018

वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन


वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

         हिंगोली,दि.01: सन 2018-19 वर्षात राज्यात सरासरी पेक्षा कमी  पर्जन्यमान झाले असून हिंगोली जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये हिंगोली, कळमनुरी, सेनगांव चारा  टंचाईची परिस्थिती उद्वभवण्याची  शक्यता आहे.  दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये सदर तालुक्यातील पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण ही योजना पशुसंवर्धन खात्यामार्फत 100 टक्के अनुदानावर हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
            सदर योजने करिता हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण रक्कम रुपये 13.90 लक्ष इतक्या रक्कमेस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. चारा टंचाईग्रस्त तालुक्यातील ज्या पशु पालक किंवा शेतकरी यांच्याकडे किमान 10 गुंठे जमीन उपलब्ध आहे. तसेच सिंचन सुविधा उपलब्ध आहे, त्यांना 10 टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते (प्रती 10 गुंठे रक्कम रु. 460/- च्या मर्यादेत) अनुदान देण्यात येणार आहे.
            या योजनेचे अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक 29 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर, 2018 असा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक/ शेतकरी  यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती येथे संपर्क साधावा, तसेच अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन खात्याचा टोल फ्री क्रमांक 18002330418 असे आवाहन पशुसंवर्धन उप आयुक्त यांनी केले आहे.
****

No comments: