19 November, 2018

दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय हुंडाबंदी दिन साजरा करण्याचे आवाहन


दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय हुंडाबंदी दिन साजरा करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि. 19:  26 नोव्हेंबर हा जिल्हास्तरीय  हुंडाबंदी  दिन म्हणून दरवर्षी  साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने  दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस  हुंडाबंदी  दिन म्हणून  दरवर्षी  जिल्हास्तरावर साजरा करण्यात येतो.
या दिवसापासून  पुढचे सात  दिवस हुंडाबंदी  सप्ताह म्हणून  घोषित करण्यात यावा, या दिवशी राज्यातील शाळा  आणि महाविद्यालयामध्ये हुंडा या विषयावरील चित्रकला,वक्तृत्व स्पर्धा इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, यादिवशी जिल्ह्यात ठिकठिकाणी महिला मेळावे आयोजित करण्यात यावेत, या मेळाव्यामध्ये महिला विषयक पुस्तके छापून त्याचे वितरण करावे, तसेच महिलांच्या कल्याणाकरिता शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, त्या योजनांची माहिती महिलांना देण्यात यावी, मेळाव्यामध्ये हुंडा निर्मुलन,देवदासी  निर्मुलन  यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, महिला मेळाव्यामध्ये विविध वक्त्यांची भाषणे तसेच वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, समाजामध्ये महिलांबाबतच्या अनिष्ठ रुढी आहेत त्यांचे उच्चाटन करण्याकरिता तसेच महिलांमध्ये हक्काची जाणीव निर्माण  होण्याकरिता महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने इतरही अनके कार्यक्रम या दिवशी आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी केले आहे.
000000

No comments: