03 November, 2018

कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी बँकाकडे 30 नोव्हेंबर पर्यंत हयातीचा दाखला सादर करावा


कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी बँकाकडे 30 नोव्हेंबर पर्यंत हयातीचा दाखला सादर करावा

        हिंगोली,दि.3: जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची यादी निवृत्ती वेतनधारकाच्या आद्याक्षरीनिहाय बँकेकडे पाठविण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेत असतील त्या बँकेत त्यांनी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2018 या कालावधीत हजर राहून यादीतील त्यांचे नाव पाहून स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. पुनर्विवाह तसेच पुर्ननियुक्तीबाबतची माहिती लागू असल्यास त्याची ही नोंद करावी. तसेच बायोमॅट्रीक पध्दतीनेही जीवनप्रमाण दाखला http://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावरून देता येईल. सदरील सुविधा उपकोषागार / कोषागार कार्यालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सेवानिवृत्ती वेतनधारक व्यक्तीस तेथे जाऊन या सुविधेचा वापर करता येईल असे कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

No comments: