14 November, 2018

वेतन पडताळणी पथकाचा दौरा


वेतन पडताळणी पथकाचा दौरा
हिंगोली,दि.14 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे नोव्हेंबर 2018 चा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक 28 ते 30 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे वेतन पडताळणी पथक या कालावधीत  येथील कोषागार कार्यालयात  उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.

No comments: