06 November, 2018

दुधाळ संकरित गायी/ म्हशीं, शेळी/मेंढी गट वाटप,मांसल कुक्कुट पक्षी संगोपन या योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन


दुधाळ संकरित गायी/ म्हशीं, शेळी/मेंढी गट वाटप,मांसल कुक्कुट पक्षी संगोपन 
या योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 6 : दुधाळ संकरित गायी/ म्हशींचे गट वाटप करणे, शेळी/मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे या नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सन 2018-19 या वर्षासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती , अनुसुचित जमाती या प्रवर्गातील 18 वर्षांवरील अर्जदारांकडून दिनांक 15 ते 29 नोव्हेंबर 2018 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशिल https://ah.mahabms.com  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी, तरी इच्छुक अर्जदारांनी वर नमूद विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.
            अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत  अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक योजनेअंतर्गत लाभार्थी निवड अंतिम होईपर्यंत बदलू नये. या नाविण्यपूर्ण दुधाळ योजनेसाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , हिंगोली यांनी कळविले आहे.
00000

No comments: