15 November, 2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

हिंगोली,दि.15: सन 2019 मध्ये आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.  
शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत.
****

No comments: