03 November, 2018

अल्पसंख्यांक समाजातील तरुणांसाठी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण जाहीर


अल्पसंख्यांक समाजातील तरुणांसाठी पोलीस शिपाई
भरतीपूर्व प्रशिक्षण जाहीर

हिंगोली दि.03 :  राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता सन 2018-19 साठी पोलिस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्याकरीता 25 सप्टेंबर, 2018 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्या अन्वये अल्पसंख्यांक समाजातील तरुणांसाठी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण  कार्यक्रम दिनांक 19 नोव्हेंबर, 2018 रोजी संत नामदेव कवायत मैदान (पोलीस परेड मैदान, हिंगोली) येथे आयोजन करण्यात आले असून सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
            तरी इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांसह मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे अहवान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
00000




No comments: