16 November, 2018

राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा






राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
                         
        हिंगोली,दि.16:  जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने आज ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. विजय निलावार, राकेश भट, श्याम सोळंके, दिलीप हाळदे, राकेश भट्ट, कन्हैया खंडेलवाल, श्री. कांबळे, विजय गुंडेकर, श्रीमती शांताबाई मोरे, श्री. दिपके, बालाजी पाठक, निलेश गरवारे, चंदू वैद्य, कपिल सावळे, बाबा ढोकणे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
            वृत्तपत्र स्वातंत्र्याची आणि पत्रकारितेतील वृत्तपत्र स्वातंत्र्याची जपणूक होऊन पत्रकारीतेतील उच्च मुल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची 16 नोव्हेंबर, 1966 रोजी स्थापन करण्यात आली. या अनुषंगाने सन 1997 पासुन दरवर्षी 16 नोव्हेंबर हा प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचा स्थापना दिवस ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ म्हणुन देशभर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने दरवर्षी प्रेस कॉन्सिल मार्फत एक विषय निश्चित करण्यात येऊन त्या विषयावर व्याख्याने, परिसंवादाचे आयेाजन करण्यात येते. यावर्षी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियामार्फत ‘डिजीटल युगातील पत्रकारीता आचार निती आणि आव्हान’ हा विषय निवडण्यात आला आहे.
            कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी न्यूज 18 लोकमत बातमीदार कन्हैय्या खंडेलवाल यांना पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा राज्यस्तर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल चव्हाण, कैलास लांडगे, श्रीमती आशा बंडगर आणि अशोक बोर्डे यांनी सहकार्य केले.

****

No comments: