13 November, 2018

सहकार पुरस्कार 2017-18 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


सहकार पुरस्कार 2017-18 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.13:महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे दिनांक 11 ऑक्टोबर 2013 रोजीच्या शासन निर्णयातील सुचनेनुसार दरवर्षी राज्यस्तरावर सहकार पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून सहकारी संस्थांचे गट निहाय/ प्रकार निहाय प्रस्ताव मागविण्यात येतात. त्याचप्रमाणे, यावर्षीही सन 2017-18 चे सहकार पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. मा.सहकार आयुक्तांनी दिनांक 03 नोव्हेंबर 2018 रोजीच्या पत्रान्वये पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करणे, प्राप्त प्रस्ताव छाननी करणे आणि पुरस्कारासाठी निवड करण्याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम जारी केलेला आहे. ह्या कालबद्ध कार्यक्रमानुसार दिनांक 13 ते 27 नोव्हेंबर 2018 सहकारी संस्थांनी प्रस्ताव तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर करावेत. तालुकास्तरावर सदर प्रस्तावांची छाननी होवून दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर 2018 दरम्यान जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांचेकडे सादर करण्यात येतील. त्यानंतर, जिल्हास्तरावर प्रस्तावांची छाननी होवून दिनांक 1 ते 6 डिसेंबर 2018 या कालावधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद यांचेकडे सादर करण्यात येतील. सदर प्रस्तावाची छाननी विभागस्तरावर झाल्यानंतर दिनांक 7 ते 12 डिसेंबर 2018 या कालावधीत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे सादर करण्यात येतील. सदर प्रस्तावाची छाननी आयुक्त कार्यालयात राज्यस्तरावर करण्यात येवून दिनांक 17 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत शासनाकडे सादर केल्यानंतर दिनांक 1 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत शासन स्तरावरील  सहकार मंत्री यांच्या अध्यक्षते खालील समितीमार्फत पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्यात येईल आणि दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी पुरस्कार वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.तरी, इच्छुक व पात्र सहकारी संस्थांनी विहित कालमर्यादेत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा निबंधक , सहकारी संस्था, हिंगोली यांनी केले आहे.
0000000

No comments: