19 November, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ


      


 जिल्हाधिकारी कार्यालयात
इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ
हिंगोली, दि. 19 : - इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्तची शपथही सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना देण्यात आली.  
तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त एकात्मतेची शपथही घेण्यात आली. यावेळी सहायक संचालक कौशल्य विकासच्या श्रीमती तम्मलवार, नायब तहसिलदार श्री. मिटकरी आदिंसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

No comments: