13 November, 2018

सामाजिक न्याय मंत्री यांचा विद्यार्थी व कर्मचारी यांच्याशी ई-लाईव्ह संवाद


सामाजिक न्याय मंत्री यांचा  विद्यार्थी व कर्मचारी यांच्याशी ई-लाईव्ह संवाद

हिंगोली, दि.13: सामाजिक न्याय विभागांतर्गत मागील चार वर्षाच्या काळात घेण्यात आलेले महत्वपुर्ण निर्णय व राबविण्यात आलेल्या योजना संदर्भात मा.मंत्री (सामाजिक न्याय) हे दिनांक 15 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी 11.30 वा. राज्यातील नागरीकांशी विद्यार्थ्यांशी व सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी यांच्या समवेत ई-लाईव्ह संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण http://elearning.parthinfotech.in  या लिंकद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच ज्या व्यक्तींना / विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावयाचे असतील त्यांनी 8384858685 या मोबाईल क्रमांकावर WhatsApp द्वारे प्रश्न विचारावेत असे आवाहन सामाजिक न्याय विभागांमार्फत करण्यात येत आहे.
            तसेच लाईव्ह सेशन पाहण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे.इंटरनेट कनेक्शन - कमीत कमी 1 Mbps स्पीड, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप,प्रोजेक्टर,मोठी स्क्रीन किंवा मोठया आकराचा टी. व्हि. (टी.व्हि. असेल तर प्रोजेक्टरची गरज नाही.) , ऑडीओ स्पीकर  , यु.पी.एस. (UPS),या व्यतिरिक्त लाईव्ह व्हिडिओ सर्व स्मार्ट फोन्स, टॅबलेट वर देखील पाहता येईल.
लाईव्ह सेशन पाहण्यासाठी सूचना :ब्राउजर चालू करा (गूगल क्रोम, मोझीला फायर फॉक्स / इंटरनेट एक्सप्लोरर इ.), http://elearning.parthinfotech.in/  ही लिंक उघडा,प्ले बटनावर क्लिक करा. आता आपल्याला लाईव्ह व्हिडिओ दिसू लागेल,कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारायचे असल्यास 8384858685 या WhatsApp नंबरवर आपले प्रश्न पाठवू शकता,तांत्रिक अडचणी आल्यास 022-27643000 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त,  समाज कल्याण,हिंगोली यांनी केले आहे.
000000


No comments: