06 November, 2018

फटाक्याच्या खरेदी विक्रीबाबत आवश्यक सूचना


फटाक्याच्या खरेदी विक्रीबाबत आवश्यक सूचना
        हिंगोली, दि.6: मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 23 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या निर्देशानुसार परवाना दिलेल्या कायम/ तात्पुरत्या फटाका विक्रेता यांनी  कमी उत्सर्जन व हरीत  फटाक्यांची विक्री करावी, कमी उत्सर्जन करणाऱ्या व हिरव्या फटाक्याची विक्री करण्यात यावी  व मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर मा. सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यामुळे फटाके विकले जाणार नाही,  संलग्न फटाक्याच्या (लड, डब्बल बॉम्ब) विक्रीवर व वापरावर बंदी असल्याने  सदर फटाक्याचा वापर होणार नाही, प्रतिबंधीत केलेले फटाके विक्री होणार नाही, फटाक्याची खरेदी विक्री ही ऑनलाईन  जसे फ्लीपकार्ट, ॲमेझॉन वगैरे  कंपनीकडून होणार नाही , ऑनलाईन खरेदी विक्री  केल्याचे दिसून आल्यास कारवाई करण्यात येईल, फटाक्यांमध्ये बेरीएम सॉल्ट प्रतिबंधीत असल्यामुळे बेरीएम सॉल्टयुक्त फटाके वापरले जाणार नाही , फटाक्याच्या हानीकारक प्रभावाविषयी  जनतेस माहिती देऊन विस्तृत जनजागृती मोहीम शाळा, महाविद्यालयांमार्फत  राबविण्यात यावी,  दिवाळी व इतर सनाच्या वेळी फटाके  रात्री 8 ते 10 या वेळेतच फोडले जातील, तसेच ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त फटाके फोडण्याची वेळी ही रात्री 11.55(PM) ते 12.30(AM)  पर्यंतच असेल , हे सर्व आदेश मा. सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असून याचे अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

No comments: