17 November, 2018

आपत्ती कालीन परिस्थितीत केलेल्या कार्याने आत्मिक समाधान मिळते - अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार






आपत्ती कालीन परिस्थितीत केलेल्या कार्याने आत्मिक समाधान मिळते
                                                  - अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार

        हिंगोली,दि.16: आपत्ती कालात उद्भवलेल्या परिस्थितीत शासन आपल्या परिने प्रयत्न करतेच परंतु सदर परिस्थितीमध्ये सामाजिक संस्थेचे कार्य, त्यांचा हातभार फार मोठा असतो. अश्या संस्थेचा सत्कार म्हनजे एकप्रकारे त्यांचा आदरच आहे.  आपत्ती कालीन परिस्थितीमध्ये केलेल्या कार्याने एक प्रकारे आत्मिक समाधान प्राप्त होते, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांनी केले.
        जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापनमध्ये कार्य करणा-या संस्था व व्यक्ती यांची बैठक व कार्यलयास सहकार्य करणा-या संस्थांचा  सत्कार समारंभा प्रसंगी श्री. मिनियार बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविद रणविरकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, त्रिशुल नवदुर्ग संस्थेचे कैलास काबरा, युवा प्रतिष्ठानचे जिल्हा समन्वयक कार्तिक इंगोले,  कोल्हापुरचे नितीन आयनापूरे, संत नामदेव समाज संस्थेचे श्री. गायकवाड , समशीर अली खान पठाण व संस्थाचे स्वयंसेवक यांची   होते.
        श्री. मिनियार पुढे म्हणाले की, आपत्ती कालीन परिस्थितीत काही संस्था विनामुल्य कार्य करुन शासनास सहकार्य करतात. आपत्ती कालीन परिस्थितीमध्ये केलेल्या कार्याने मनास आत्मिक समाधान लाभतेच व ते समाधान चिरकाल टिकणारे असते. आपत्ती व्यवस्थापन परिस्थिती उद्भवण्यापूर्वी गावागावांत जावून पुर्व जागृत्ती करण्याची सुचनाही यावेळी त्यांनी केली.
       यावेळी त्रिशुल नवदुर्गा महोत्सव समिती चे कैलास काबरा, युवा प्रतिष्ठानचे कार्तीक इंगोले, व कोल्हापूरचे नितीन आयनापूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी  आपत्ती व्यवस्थापनामध्ये कार्य करणा-या सर्व संस्थांचा प्रशस्तीपत्र देवून व कळनमुरीचे शमशीर अली खान पठाण यांना रक्षक पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी केले.

****
















No comments: