13 December, 2021

 

हिंगोली तालुकास्तरीय भाषण स्पर्धेतील तीन युवकांची

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 :  नेहरु युवा केंद्र हिंगोली, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार व आदर्श महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने  तालुकास्तरीय भाषण स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  देश भक्ती आणि राष्ट्र निर्माण या विषयाला अनुसरुन ‘‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’’ या विषयावर अनेक युवक व युवतींनी आपले विचार व्यक्त केले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक  प्रतिक्षा कांबळे, द्वितीय क्रमांक प्रविण पांडे, तृतीय  क्रमांक प्रतिक्षा गायकवाड यांनी  पटकावले आहे. या तिन्ही युवकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही स्पर्धा आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. पिंपळपल्ले, प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. मस्के तर परिक्षक म्हणून प्रा.टी.व्ही. आडे, प्रा.एम.एम. मंगनाळे, प्रा. हापगुंडे हे होते. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. चव्हाण व शिक्षकवृंद आणि नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक संदीप शिंदे, नामदेव फरकंडे, कृष्णा पखवाने, सिंधू केंद्रे यांची यावेळी उपस्थिती होती. 

*****

No comments: