21 December, 2021

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकल कलाकारांनी

अर्थसहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकल कलाकारांना ठोक एक रक्कमी अर्थसहाय्य देण्यासाठी शासन योजना राबवित आहे. त्यानुसार शासनाकडून प्रती कलाकारासाठी 5 हजार रुपये अर्थसहाय्य  देण्यात येणार आहे. त्यासाठी एकल कलाकारांनी (वैयक्तीक) विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज  भरुन संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे सादर करावेत. तसेच संस्था, समूह, फड, पथक यांचे अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व सहाय्यक सांस्कृतिक कार्य संचालनालय, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील क्षेत्रीय कार्यालयात सादर करावेत.

यासाठी लागणारे विहित नमुन्यातील अर्ज  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली व संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. हे वृत्त प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसाच्या आत लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत. याबाबतची अधिक माहिती  http://Mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

           कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त कलाकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके यांनी केले आहे.

*******

No comments: