08 December, 2021

 


जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 :  संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: