20 December, 2021

 



नेहरु युवा केंद्रासह सर्वांनी तळागाळापर्यंत जाऊन

राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 :  कोरोना विरुध्दच्या लढ्यात यशस्वी होण्यासाठी नेहरु युवा केंद्र संघटनासह सर्वांनी सज्ज होऊन तळागाळापर्यंत जाऊन सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.  

येथील नेहरु युवा केंद्राच्या वतीने कै.बाबूराव पाटील-गोरेगावकर महाविद्यालयात सबका साथ सबका विकास कार्यक्रम अंतर्गत राष्ट्र आणि समाज बळकटीकरणासाठी दि. 18 डिसेंबर, 2021 रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. पापळकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जयवंत भोयर हे होते.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवीण पांडे यांनी प्रथम क्रमांक, वैष्णवी सावंत यांनी द्वितीय क्रमांक तर अस्मिता मुळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या सर्व विजेत्यांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते अनुक्रमे पाच हजार, दोन हजार व एक हजार रुपये रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी प्रास्ताविकातून स्पर्धा आयोजनामागची माहिती दिली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय निलावार, प्रा.मुरलीधर जायभाये, प्रा. दत्ता कुंचलवाड, कै.बाबूराव पाटील कॉलेजचे शिक्षक वृंद, कर्मचारी, नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक नामदेव फरकांडे, संदीप शिंदे, अनिल बिंगे, कृष्णा पाखवणे, शंकर ड्युटे हे उपस्थित होते.

*****

No comments: