10 December, 2021

 

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यातील उमेदवारांना राज्यातील विविध नामांकित उद्योग, व्यवसायामध्ये निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने  दि. 12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.  या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यामध्ये होमपेजवरील नोकरी साधक (Job Seeker) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दिनदयाल उपाध्याय जॉबफेअर या बटनवर क्लिक करुन त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021 या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय रिक्त पदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची  निवड करावी.

हा मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन रा. म. कोल्हे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

 

*****

No comments: