02 December, 2021

 


आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त

शिवाजी महाविद्यालयात जनजागृतीचा कार्यक्रम

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आझादी का अमृत महोत्सव, आंतरराष्ट्रीय दत्तक महिना आणि बाल हक्क सप्ताहानिमित्ताने येथील शिवाजी महाविद्यालयात दि. 1 डिसेंबर, 2021 रोजी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे यांनी बालकांचे हक्क व योजना तसेच बालकांच्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले.

******

No comments: