07 December, 2021

 

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित यंत्रणानी

आपणाकडे सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

-- निवासी उपजिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर

हिंगोली (जिमाका), दि. 07 :  जिल्ह्यातील औंढा नागनाथ व सेनगाव नगरपंचायतीचया सदस्य पदांच्या निवडणुकीशी संबंधित यंत्रणांनी आपणाकडे सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक-2021 च्या सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विक्रीकर विभागाचे सहायक विक्रीकर आयुक्त, आयकर अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी औंढा नागनाथ व सेनगाव नगर पंचायतीच्या सदस्य पदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आचार संहितेची प्रभावीपणे  अंमलबजावणी , खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग, मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकूश ठेवणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, संवेदशनशील व अति संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवणे, बँकामार्फत मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवणे यासह इतर अनुषंगिक बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वं संबंधित यंत्रणानी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याबाबत सूचना केल्या.  

                                                                        *****

No comments: