21 December, 2021

 

नाफेडच्या वतीने तूर खरेदी केंद्र निश्चित

हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 :  केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम 2021-22 मध्ये  तूर  हमीभावाने  खरेदी  करण्यासाठी दि. 20 डिसेंबर, 2021 पासून खरेदी केंद्रावर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.

तूर नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी,  वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ येथे आठ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            हिंगोली तालुक्यासाठी प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था , हिंगोली ही संस्था असून त्याचा पत्ता जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर, तोफखाना, हिंगोली  असा आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून समीर भिसे हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422922222 असा आहे. तसेच संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा, कन्हेरगांव ता. जि. हिंगोली या संस्थेवर केंद्रचालक म्हणून अमोल काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र.7820863673 असा आहे.

कळमनुरी तालुक्यासाठी कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी ही संस्था असून या संस्थेवर केंद्र चालक म्हणून महेंद्र माने, भ्रमणध्वनी क्रमांक 9736449393  आणि वारंगा फाटा ता. कळमनुरी येथील केंद्रासाठी विजय ठाकरे हे केंद्र चालक असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 6209939393  हे कामकाज पाहणार आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यासाठी जवळा बाजार केंद्रासाठी औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) ही संस्था असून त्याचा पत्ता जवळा बाजार ता. औंढा नागनाथ असा आहे. या संस्थेवर  केंद्र चालक म्हणून कृष्णा हरने हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9175586758 असा आहे.

वसमत तालुक्यासाठी  वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत ही संस्था असून त्याचा पत्ता मार्केट कमिटी, वसमत असा आहे. यावर केंद्र चालक म्हणून सागर इंगोले हे काम पाहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमाक 8390995294 असा आहे.

सेनगांव तालुक्यासाठी श्री संत भगवानबाबा  स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज ही संस्था असून त्याचा पत्ता साई ॲग्रो इंडस्ट्रीज जिनिंग फॅक्ट्री, तोष्णीवाल कॉलेज समोर, हिंगोली रोड, सेनगाव असा आहे. या केंद्राचे केंद्र चालक म्हणून संदीप काकडे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7758040050  असा आहे. विजयालक्ष्मी बेरोजगार सह. संस्था मर्या कोळसा ही संस्था असून त्यांचा पत्ता साखरा ता. सेनगाव जि. हिंगोली असा आहे. यावर केंद्रचालक  म्हणून उमाशंकर माळोदे  हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9657260743 असा आहे.

            शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी हंगाम 2021-22 मधील पीक पेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाईन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबूकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक,  आय.एफ.एस.सी. कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावे, असे आवाहन के. जे. शेवाळे,जिल्हा पणन अधिकारी परभणी/हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****

No comments: