19 June, 2023

 

हिंगोली जिल्ह्यातील 11 महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रत्येकी 05 संचालकांना

शेतकरी उत्पादन कंपनीचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन

 





हिंगोली (जिमाका), दि. 19 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान (उमेद) आणि महिला अर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून स्थापित समुदाय आधारित संस्था यांचे मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत  स्थापन झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील 11 महिला शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) यांच्या प्रत्येकी 05 संचालकांसाठी दि. 17 जून, 2023 रोजी येथील जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 

या  कार्यशाळेत  जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत, श्री. गलांडे, श्री. आर. दांडगे तसेच सर्व तालुका अभियान व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. 

या कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन या विषयावर श्री.आर.सुरवसे व श्री. डी. खाडे यांनी सविस्तर  मार्गदर्शन केले.  तसेच पिक विमा, 50 लाख प्रती कंपनी उलाढाल आणि 40 टक्के स्वहिस्सा  इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन श्री. गलांडे  यांनी केले.  तसेच विक्रम सारस्वत यांनी सर्व संचालकांना भागधारक जोडणी व इतर उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन व सर्व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष आणि संचालकांना आवाहन केले.

या कार्यशाळेत प्रभाग समन्वयक, CMRC मॅनेजर व उपजीविका सल्लागार, संचालक पूर्णवेळ उपस्थित होते.

*****

No comments: