12 June, 2023

 

अंमली पदार्थ विरोधी पंधरवड्याचा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन

 




 

            हिंगोली (जिमाका), दि. 12 : नशा मुक्त भारत अभियान समितीच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त येथील सामाजिक न्याय भवनात जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या  हस्ते आज दि. 12 जून रोजी  प्रतिकात्मक अंमली पदार्थांचे दहन करुन अंमली  पदार्थ विरोधी  पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. 

            येथील जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 26 जून,2023 दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पंधरवडा उद्घाटन कार्यक्रमास नशा मुक्त भारत अभियान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, समाजकल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी  आर. एच. एडके,  नशाबंदी  मंडळाचे  जिल्हा संघटक विशाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

        जिल्ह्यातील उपविभागातील वसमत-औंढा तालुक्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या मेळाव्यात नशाबंदी  मंडळाचे  जिल्हा  संघटक  विशाल अग्रवाल  यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी   व्यसनमुक्तीचा  संकल्प दिला. नशाबंदी मंडळ आयोजित व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनीचे जिल्हाधिकारी जितेंद्र  पापळकर यांनी अवलोकन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा  समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके यांनी केले. या कार्यक्रमास  जिल्ह्यातील  स्वयंसेवी  संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

******

No comments: