19 June, 2023

 

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

                                                 

                हिंगोली (जिमाका), दि.19 : पंतप्रधान महोदयांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभूत आहे. तसेच केंद्र शासनाने दि. 21 जून, 2023 हा दिवस नववा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

                योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. दि. 21 जून, 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करुन जगभरातील लोकांना योगाच्या सुसंस्कृतपणाबद्दल आठवण करुन देण्यासाठी जनतेमध्ये कायमस्वरुपी , चिरस्थायी जनहित निर्माण करण्यासाठी सर्वांचे आरोग्य आणि भावनिक निरोगीपणा सुधारणा, एक लक्षणीय मालमत्ता म्हणून त्यांचे महत्व आणि योगदान यावर प्रकाश टाकून योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे तसेच योगासने नागरिकांचा एक अविभाज्य भाग बनविणे आणि त्याद्वारे सर्वांसाठी आरोग्यदायी जीवन जगणे हे योग दिनाद्वारे सरकारचे उद्दिष्ट आहे.  

त्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पंतजली योग समिती, योग विद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदानावर नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन दि. 21 जून, 2023 रोजी सकाळी 5.45 वाजता करण्यात आले आहे.

या योग‍ दिनासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक, योग साधक, खेळाडू यांनी उपस्थित राहून योगाचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या कार्यालयामध्ये, शाळेत, विद्यालयात, महाविद्यालयात करण्यात आलेल्या योग कार्यक्रमाचे नियोजन, निश्चित केलेली स्थळे, फोटो, सहभागी युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, सामान्य नागरिक इत्यादींची संख्या दि. 21 जून, 2023 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत dsohingoli01@gmail.com या ई-मेल पत्यावर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

*****

 

 

No comments: