19 June, 2023

 

गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेसाठी पात्र गोशाळांनी अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : राज्यस्तरीय योजनेंतर्गत सुरु असलेली गोवंश केंद्र ही  योजना सन 2023-2024 या आर्थिक वर्षापासून सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र ही नवीन योजना राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर ही दोन जिल्हा तसेच दि. 16 एप्रिल, 2027 च्या शासन निर्णयातील ज्या 32 तालुक्यातील गोशाळांना अनुदान देण्यात आले आहे. अशा तालुक्यांना वगळून 34 जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक याप्रमाणे 324 तालुक्यासाठी ही योजना राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यास अनुसरुन सन 2023-2024 या वर्षासाठी 324 तालुक्यामधून सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेसाठी पात्र गोळाशाळाकडून नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने योजनेचे उद्देश, देय अनुदान, अर्जाचा विहित नमुना, अर्ज करण्याची पध्दत याबाबत शासनाने मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याने इच्छूक संस्थांनी विहित नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे कार्यालय, एस-3, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नांदेड रोड, हिंगोली या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: