04 June, 2023

 ओडिशा रेल्वे अपघात प्रकरणी नियंत्रण कक्ष कार्यान्वित      

संपर्क साधण्याचे आवाहन   


              हिंगोली (जिमाका), दि. ०४ : ओडिशा राज्यात झालेल्या रेल्वेच्या तिहेरी अपघाताच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन सेवेसाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संपर्क प्रमुख म्हणून रोहित कंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

             ओडिशा राज्यातील रेल्वेच्या तिहेरी अपघातात 200 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९४०५४०८९३९ व ०२४५६-२२२५६० असा आहे. 

             हिंगोली जिल्ह्यातील काही नागरिक ओडिशा राज्यात रेल्वे मार्गाने प्रवासासाठी किंवा इतर काही निमित्ताने गेले असतील आणि त्यांचा संपर्क होत नाही, अशा नागरिक आणि प्रवाशांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

******

No comments: