15 June, 2023

 

फ्रान्स (ल्योन) येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 मध्ये

जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे

          

 

            हिंगोली (जिमाका), दि. 15 : दर दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पीक खेळासारखीच आहे.

            या स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.

            या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी, 2002 किंवा त्यानंतर असणे अनिवार्य आहे. तसेच Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Industrial Design Technology, Industry 4.0, Information, Information Network Cabling, Machatronics, Robot System Integration & Water Technology या क्षेत्राकरिता उमेदवारांचा जन्म दि. 1 जानेवारी, 1999 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

            स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच कळविण्यात येणार आहे. फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन आणि इतर प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी तसेच कौशल्य धारण केलेल्या युवक-युवतींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास इच्छूक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी केले आहे.

*****  

No comments: