05 June, 2023

 

जागतिक पर्यावरण दिन मोठया उत्साहात साजरा

 

 



            हिंगोली (जिमाका), दि. 05 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, हिंगोली, सामाजिक वनीकरण विभाग, हिंगोली तसेच विवेकांनद शिक्षण प्रसारक मंडळ, पहेनी, भारतीय जैन संघटना (BJS), जायंन्टस इंटरनॅशनल शाखा-हिंगोली, सद्भाव सेवा भावी संस्था,हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

            या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जायंन्टस ग्रुपचे अध्यक्ष किरण लाहोटी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, वनपाल तुराबभाई एम.सय्यद, मेजर जगन्नाथ सांळुके, रत्नाकर महाजन, गोविंदप्रसादजी झुंनझुनवाला, डॉ.संजय नाकाडे, शिवशरण रटकलकर, अभयकुमार भरतीया, अवचार, मधुसूदन अग्रवाल, विशाल इंगोले आदी  प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

            याप्रसंगी             उपस्थित मान्यवरांनी वृक्ष लागवडीचे महत्व समजाऊन सांगत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपाच्या वेळी जायंन्टस ग्रुपचे अध्यक्ष किरण लाहोटी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी काढलेले उद्गार " रक्तदाना इतकेच पर्यावरणासाठी वृक्ष लागवडीचे महत्व असल्याचे सांगितले.

यावेळी नवतरुणांची नवीन समिती तयार करण्यात येऊन पर्यावरणाची शपथ देण्यात आली. तसेच वृक्षांची लागवडही करण्यात आली. प्रत्येक व्यक्तीला वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन पाच झाडे प्रतिव्यक्ती असे लक्ष ठेवण्याचे ठरले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेडरेशन ऑफीसर डॉ.संजय नाकाडे  यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रत्नाकर महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन निळकंट गायकवाड यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

             या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: