20 June, 2023

 

शासन आपल्या दारी या मोहिमेंतर्गत दहावी आणि बारावी नंतर काय ?

या विषयावर ऑनलाईन शिबिराचे आयोजन

 

 

        हिंगोली (जिमाका), दि. 20 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयामार्फत शासन आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत दहावी आणि बारावी नंतर काय ? या विषयावर दि. 23 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत https://meet.google.com/fio-eohp-wey या लिंकवर ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

            या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये विवेकानंद पटणे, शाखा व्यवस्थापक, बन्सल कोचिंग क्लासेस, हिंगोली हे मार्गदर्शन करणार आहेत.

या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी meeting URL: https://meet.google.com/fio-eohp-wey या ऑनलाईन लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google meet app)  यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app)  मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद (Mute) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु (unmute) करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी व्हावेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

****

No comments: