19 June, 2023

 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अनेक इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. या अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात दि. 26 ते 28 जून, 2023 या कालावधीत जिल्हास्तरीय समितीद्वारे (DLC) द्वारे शिफारशीत उमेदवारांसाठी "क्षमता बांधणी" या विषयावर तीन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बीजभांडवल योजनेतील बचत गटाच्या लाभार्थ्यांसाठी (ज्यांनी सूक्ष्म अन्नप्रक्रिया प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्यांसाठी फक्त) दि. 26 जून रोजी प्रशिक्षण आयोजित केले आहे.

या प्रशिक्षणामध्ये भाग घेण्यासाठी वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता नसून ऑनलाईन अर्ज केलेले सर्व उमेदवार पात्र आहेत. अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षक आणि विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) सौ. रोहिणी शिंदे यांच्याशी 9970996883 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. पी.पी.शेळके यांनी केले आहे.

*****

No comments: