06 January, 2026

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 06 : येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथमतः मराठी पत्रकार सृष्टीचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित करुन मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी जेष्ठ पत्रकार एहसान खान पठाण, कल्याण देशमुख, प्रद्युम्न गिरीकर, शांताबाई मोरे, वसंत भट, तुकाराम झाडे यांनी पूर्वीची पत्रकारिता आणि आताचा पत्रकारिता तसेच त्यांना आलेले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित करुन मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती . यानिमित्त दरवर्षी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो, असे सांगून कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रकाश इंगोले यांनी केले, तर शेवटी पत्रकार राकेश भट यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचे आभार मानले. यावेळी नंदकिशोर तोष्णीवाल, सुभाष अपुर्वा, प्रसाद आर्वीकर, दिलीप हळदे, यु.एच.बलखंडे, सचिन कावडे, कल्याण देशमुख, विलास जोशी, सुधाकर वाढवे, राजेंद्र हलवाई, पल्लवी अटल, मकरंद बांगर, नंदकिशोर कांबळे, बालाजी पाठक, बाळू जाधव, राजू गवळी, गजानन मगर, गोपाळ सरनायक, गजानन वाणी, प्रेस फोटोग्राफर सुनिल पाठक, विजय गुंडेकर, अरुण दिपके, रवी शिखरे यांच्यासह इतर पत्रकार, आरोग्य विभागाचे जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी मारोतराव पोले, उपसंपादक चंद्रकांत कारभारी, श्रीकांत देशमुख, मनोहर भारती, गंगा देशमुख आदींची उपस्थिती होती. *****

No comments: