02 January, 2026
बाल विवाहमुक्त भारत उपक्रमांतर्गत अनुसया विद्यामंदिर येथे विशेष कार्यक्रम
हिंगोली (जिमाका), दि.02 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार अनुसया विद्यामंदिर, खटकाळी (ता. जि. हिंगोली) येथे “बाल विवाहमुक्त भारत” या उपक्रमांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंध कायद्यातील तरतुदी तसेच बालकांच्या शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासावर होणारा परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे केसवर्कर राजरत्न पाईकराव उपस्थित होते. तसेच अनुसया विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नरेंद्र मोगरगे, अंकुश वानखेडे आदी शिक्षकवृंद, महिला कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये बालविवाह प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण होऊन बालविवाहमुक्त समाज घडविण्याचा संदेश देण्यात आला.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment