19 April, 2020

आजपासून वृत्तपत्रे वितरणास बंदी



हिंगोली,दि.19: राज्य शासनाने करोना विषाणुचा (कोवीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 एप्रिल, 2020 पासुन लागु करुन खंड 1, 3 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी यांना (कोवीड-19) नियंत्रण आणण्याठी त्यांच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपायोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणुन घोषित करण्यात आलेले आहेत.
            राज्य शासनाने आदेश काढून वृत्तपत्र नियतकालीके यांचे घरोघरी वितरण करण्यास प्रतिबंधीत केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना नियमावली मधील तरतुदीनुसार तसेच राज्य शासनाच्या सुधारीत अधिसुचनेनुसार हिंगोली जिल्ह्यातील वृत्तपत्र नियतकालीके यांचे घरोघरी दि. 20 एप्रिल, 2020 पासुन वितरण करण्यास बंदी करण्यात आली आहे.
            या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****


No comments: