08 April, 2020

रेशनच्या मालाची वितरणापूर्वी तपासणी करा - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड



हिंगोली,दि.8: कोरोनाच्या वैश्वीक संकटाने देशात सर्वत्र राष्ट्रीय आपत्तीचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकार संकटाचा मुकाबला करतांना हरतऱ्हेने प्रयत्न करीत आहे. अशावेळी  रेशनच्या मालाच्या दर्जावरुन सांशकता निर्माण होऊ नये, यासाठी रेशनच्या मालाची वितरणापुर्वी तपासणी केली जावी असे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नागरीकांना घरीच राहाण्याचे आवाहन केले आहे. गरजवंताना जिवनाश्यक वस्तुचा पुरवठा करण्याचे व्यवस्थीत नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानातून लाभार्थ्यांना गहु, तांदुळ तसेच डाळही वितरण केली जात आहे. रेशनच्या मालाबाबत सांशकता व्यक्त केली जाऊ नये, यासाठी मालाच्या वितरणापुर्वी दर्जाची तपासणी करावी. तसेच रेशन दुकानदारांनी लभार्थ्यांना हात धुण्यासाठी सॅनीटायझर किंवा हॅन्ड वॉश उपलब्ध करुन द्यावे. दुकानावर मालाचे वितरण करतांना गर्दी होणार नाही यादृष्टीने उपाययोजना करावी अशा सूचना पालकमंत्री यांनी  केल्या आहेत.

****

No comments: