19 April, 2020

वस्तू, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना आजपासुन लॉकडाऊनमधुन सुट



हिंगोली,दि.19: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश देण्यात आले आहे.
            राज्य शासनाने लाकडाऊन संदर्भात नवीन सर्व समावेशक अधिसुचना जारी केली असुन या अतिरिक्त औद्योगिक घटकासह शेती विषयक बाबी बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सुट देण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टसींगच्या नियमाचे पालन करुन मनरेगा अंतर्गत कामे करण्याच्या समावेश या अधिसुचनेत करण्यात आला आहे. तसेच राज्य शासकीय कार्यालयामध्ये 10 टक्के अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच जनतेच्या अडचणी जाणुन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दि. 20 एप्रील, 2020 पासुन काही सेवाना लॉकडाऊन मधुन सुट दिली असुन यामध्ये खालील सेवांचा समावेश आहे.
सर्व प्रकारचे वस्तु, माल, घेवुन जाणारे ट्रक तसेच इतर वाहने यांना दोन चालक एक मदतनीस यांच्यासह प्रवास करण्याची परवानगी असेल, परंतु वाहन चालक यांच्याकडे वैध वाहन परवाना आवश्यक आहे. तसेच माल वस्तुंची पोहच केल्यानंतर रिकामा ट्रक / वाहन परत घेवुन जाण्यास परवानगी असेल. ट्रक दुरुस्तीची दुकाने सुरु ठेवता येतील परंतु केंद्र आणि राज्य शासनाने सोशल डिस्टंसिंगचे घालुन दिलेले नियम पाळणे आवश्यक असेल.
या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहिता (1860 चा 45) यांच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र असलेल्या अपराध केला आहे असे मानन्यात येईल.  जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

No comments: