29 April, 2020

सेवायोजना कार्यालयात नोंद असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आधार लिंक करण्याचे आवाहन



हिंगोली दि.29: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली कार्यालयाकडे नांव नोंदणी केलेल्या नौकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड ऑनलाईन लिंक करण्याची आवश्यकता आहे. नोकरीसाठी सेवायोजना कार्यालयाकडे नांव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा,ऑनलाईन पध्दतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यात वेळोवळी आयोजीत करण्यात येणा-या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळवीणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण देणा-या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसुचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी आपल्या नोंदणीस आधार क्रमांक जोडणी करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवार अनेक संधी पासून वंचित राहू शकतात. त्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी तात्काळ सर सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच http://www.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवर उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकाला आधारकार्ड ऑनलाईन लिंक करावे, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी प्रसिध्दी पत्राकान्वये कळविले आहे.
****

No comments: