11 May, 2022

 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समुदपदेशनाने बदल्याचे 13 मे रोजी आयोजन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 11 : हिंगोली जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वसाधारण बदल्या -2022 साठी सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यासाठी दि. 13 मे, 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या षटकोनी/नक्षत्र सभागृहात सकाळी 11.00 वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे. 

प्रशासकीय व विनंती बदल्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी संबंधित विभागाचे वेळापत्रक निश्चित करुन देण्यात आलेले आहे. संबंधित विभागाच्या वेळापत्रकानुसार आवश्यक कागदपत्रांसह नेमून दिलेल्या वेळेत जिल्हा परिषदेच्या षटकोनी/नक्षत्र सभागृहात रहावे, असे ए.एल. बोंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

 

No comments: