10 May, 2022

 

आदिवासी शेतकऱ्यांनी ट्यूब वेल व पंपसेट साठी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 :  विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात ट्यूब वेल + पंपसेट देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कळमनुरी जि.हिंगोली यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांनी अर्जासोबत अनुसूचित जमातीचे सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, जमिनीचा सातबारा, किमान 0.60 आर लागवडीलायक शेती असल्याचा पुरावा, पासबूकची झेरॉक्स प्रत, रहिवाशी प्रमाणपत्र, ओळखपत्र किंवा आधारकार्ड, तसेच या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला नसल्याचे स्वयंघोषणा प्रमाणत्र, दोन पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडून परिपूर्ण कागदपत्रासह प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या नावे दि. 13 मे ते 20 मे, 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: