02 May, 2022

 

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या

प्रचार व प्रसार कार्यक्रमांतर्गत माहितीपत्रक, घडीपुस्तिकेचे वाटप

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 02 : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर शासकीय वसतिगृह, नगर पंचायत, तहसील कार्यालय,पंचायत समिती अशा ठिकांनी विविध योजनांच्या प्रचार व प्रसार कार्यक्रमांतर्गत माहितीपत्रक, घडी पुस्तिका यांचे वाटप करण्यात आले.

            सेनगाव येथील    शासकीय वसतिगृहात 01 मे या महाराष्ट्र व कामगार दिनी ध्वजारोहणानंतर गृहपाल विजयकुमार सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांच्या प्रचार व प्रसार कार्यक्रमांतर्गत उद्देशिका, माहितीपत्रक, घडी पुस्तिका यांचे सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच सेनगाव येथील नगर पंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती अशा ठिकांनी विविध योजनांच्या प्रचार व प्रसार कार्यक्रमांतर्गत माहितीपत्रक, घडी पुस्तिका यांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध योजनांची माहिती संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना देण्यात आली. याप्रसंगी वरील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी,  वसतीगृहातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

            नगर पंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल गौरवोउद्गार व्यक्त केले.

*****

No comments: