02 May, 2022

 

हिंगोली जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनेचा नामफलक

मराठी भाषेत असतील याची दक्षता घ्यावी                            

 

हिंगोली, (जिमाका) दि. 02 : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन ) अधिनियम 2017 दिनांक 17 मार्च, 2022 च्या अधिसुचनेद्वारे सुधारणा करण्यात आलेली असून कलम 36 (क) (1) कलम-6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थानेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम-7 लागू आहे त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे, देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नाफलक देखील असू शकतील, मराठी भाषेतील अक्षर लेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल अणि मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. तसेच ज्या आस्थापनेमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते आशी आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड किल्ल्याची नांवे लिहिणार नाहीत.

            महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम – 2017 मधील नमूद बदल        (सुधारणा) लक्षात घेऊन हिंगोली जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी त्यांच्या दुकाने आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: