29 October, 2026

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा हिंगोली दौरा


हिंगोली, दि. 29 ऑक्टो (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे

अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे हिंगोली दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 


शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन. सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे महामंडळाचे लाभार्थी व मराठा समाजातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महामंडळाच्या योजनांबाबत, लाभार्थ्यांच्या अडचणीबाबत, प्रलंबित प्रकरणांबाबत बैठक घेतील. दुपारी 3 वा. हिंगोली येथे पत्रकार परिषदेस उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 6 वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून परभणीकडे प्रयाण करतील. 

                                                                                  00000

No comments: