23 May, 2023

 

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 11 वी प्रवेशासाठी निवड चाचणी

ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन


 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यातील वसमतनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी दि. 31 मे, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस. वाघमारे यांनी केले आहे.

वसमतनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थी हा हिंगोली जिल्ह्यातील शासनमान्य शाळेतून सन 2022-2023 या वर्षात दहावी उत्तीर्ण झालेला असावा. विद्यार्थ्याचा जन्म दि. 1 जून, 2006 ते 31 जुलै, 2008 या कालावधीतील असावा. ही अट सर्वांसाठी लागू असेल.

जवाहर नवोदय विद्यालयातील अकरावीची प्रवेश परीक्षा दि. 22 जुलै, 2023 रोजी सकाळी 11.30 होईल. प्रवेश चाचणी परीक्षा-2023 साठी www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस. वाघमारे (मो. 9511676209), कार्यालयीन अधीक्षक श्री. श्रीनिवास (मो.9182293280), लिपिक राजू जोंधळे (मो. 9921358358, 7020275149) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य एस. एस. वाघमारे यांनी केले आहे.

*****

No comments: